पृथ्वीराज चव्हाणांनी रस्त्यावरील अपघात पाहून थांबवली गाडी; स्वत:च्या ताफ्यातून जखमींना केले रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. एका खासगी कार्यक्रमाला जात असताना रस्त्यात अपघात घडल्याचे कळताच चव्हाण हे आपला ताफा थांबवत मदतीला धावून जाताना दिसले. इतकेच नव्हे तर या अपघातातील जखमींना ताफ्यातील गाडीतून दवाखान्यात हलवले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबाबत लिहले कि, ”आज एका लग्न समारंभाला जाताना कराड येथे सैदापुर कॅनाल येथे अपघात झाला. त्याच वेळी माझा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता. अपघात पाहून गाड्यांचा ताफा थांबवला. गाडीतून खाली उतरत प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती. प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सुचना केल्या. व ताफ्यातील गाडीतून जखमींना दवाखान्यात हलवले.”

सध्या अपघातग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरु असून चव्हाण यांच्या निर्देशानंतर वैद्यकीय यंत्रणा जातीने जखमींवर लक्ष देऊन आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कृतीवर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केलं जात आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्यांच्या कृतीवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.facebook.com/prithvrj/posts/2893816727530952

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like