पृथ्वीराज चव्हाणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब..!! २ दिवसांत कळणार अधिकृत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सकलेन मुलाणी

स्वच्छ आणि कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा मिळवलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कराड विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कराडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कराड आणि सातारा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणारी विधानसभा लढवायची की लोकसभा हा पेच सोडवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. सभेच्या ठिकाणी येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दक्षिण दक्षिण असा नारा सुरु ठेवला होता.

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. चार दिवसाच्या दिल्लीवारी नंतर आज कराडमध्ये आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या कराड दक्षिण मधील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली. पृथ्वीराज चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र त्या अगोदर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांनी कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढावी अशी मागणी केली, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा लढणार की लोकसभा याबाबत दोन दिवसात निर्णय होईल, मात्र जो निर्णय होईल तो मान्य करून शासनाच्या विरोधातील क्रांतीची सुरुवात कराड दक्षिणमधून करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी भाजप सरकारच्या सूडबुध्दीवर ताशेरे ओढले. उद्या माझी ईडी चौकशी करायलाही ते कमी पडणार नाहीत असं सांगत पी. चिदंबरम यांचे कोठडीत हाल होत असल्याचं पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कराडमधील मतदारांनी मला १९९१ पासून मदत केली असून त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही म्हणत पुढील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. यामुळे पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असल्याने येत्या दोन दिवसांत सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येणार एवढं मात्र नक्की..

व्हिडियो पाहण्यासाठी लिंक –

[youtube https://www.youtube.com/watch?v=SEmpjCRgW_g&w=640&h=360]

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

Leave a Comment