पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल काल दुपारी १ च्या दरम्यान लागला. निकाल लागताच पुण्यातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. २०१७ रोजी घेण्यात आलेल्या ६५० जागांसाठीच्या परीक्षेत मुख्य परिक्षेसाठी १०,००० हजारापेक्षा जास्त उमेद्वार उत्तीर्ण झाले होते.
२०१७ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल उशिरा लागला. तब्बल दीड वर्षानी निकाल लागल्याने उमेद्वारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलीस उपनिरीक्षक या परिक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून काही विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत.
सर्वसाधारण गटातून सुमित कलप्पा खोत (देवरुख , रत्नागिरी ) राज्यात प्रथम
मागासवर्ग गटातून विष्णुपंत तिड़के प्रथम ( बीड ) राज्यात प्रथम
महिला गटातून अश्विनी हिरे ( धुळे,पिंपळनेर ) राज्यात प्रथम
भटक्या विमुक्त गटातून मारुति वाघमारे (इंदापुर, पुणे ) राज्यात प्रथम
बऱ्याच कालावधीनंतर लागलेला निकाल पाहुन विजयी उमेद्वारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या बरोबरच अनेक विद्यार्थ्यांनी दुचाकी रॅली काढून आनंद व्यक्त केला.