PSL 2024 : आजपासून रंगणार पाकिस्तान सुपर लीगचा महासंग्राम; इथे पहा Live सामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PSL 2024 : आज म्हणजेच १७ फेब्रुवारी पासून पाकिस्तान सुपर लीगचा महासंग्राम रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दरवर्षी पाकिस्तान सुपर लीग (PSL) आयोजित करत असते. आत्तापर्यंत या क्रिकेट लीगचे 8 सीझन झाले आहेत. आता यंदाची PSL आजपासून सुरु होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभाग घेताना पाहायला मिळतील. या स्पर्धेत एकूण ३६ सामने खेळवण्यात येणार असून १८ मार्चला अंतिम सामना खेळवला जाईल.

पहिला सामना कोणत्या संघामध्ये –

पाकिस्तान सुपर लीग 2024 मध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये मुलतान सुलतान, लाहोर कलंदर, इस्लामाबाद युनायटेड, पेशावर जाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि कराची किंग्ज या संघांचा समावेश आहे. हे सर्व संघ एकूण ३६ सामने खेळतील. पाकिस्तान सुपर लीगचे (PSL 2024) सर्व सामने लाहोर, रावळपिंडी, कराची आणि मुलतानच्या मैदानावर खेळवण्यात येतील. आज या स्पर्धेचा पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर यांच्यात होणार आहे. यावेळी इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार शादाब खान आणि लाहोर कलंदरचा कर्णधार शाहीन शाह अफरीदी आमनेसामने येतील.

कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग –

PSL चे दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार 2.30 वाजता सुरु होतील. सायंकाळचे सामने रात्री ८.०० वाजता तुम्ही पाहू शकता. भारतात PSL 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि PSL च्या ऑफिशिअल वेबसाइटवर होईल. या स्पर्धेचे भारतात थेट प्रक्षेपण होणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

PSL 2024 वेळापत्रक:

17 फेब्रुवारी: लाहोर कलंदर विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड – रात्री 8.00 वाजता
18 फेब्रुवारी: क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी – दुपारी 2:30
18 फेब्रुवारी: मुलतान सुलतान विरुद्ध कराची किंग्ज – रात्री 8:00 वाजता
19 फेब्रुवारी: लाहोर कलंदर विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स – रात्री 8.00 वाजता
20 फेब्रुवारी: मुलतान सुलतान विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड – रात्री 8:00 वाजता
21 फेब्रुवारी: पेशावर झल्मी विरुद्ध कराची किंग्ज – दुपारी 2:30
21 फेब्रुवारी: मुलतान सुलतान विरुद्ध लाहोर कलंदर – रात्री 8:00
22 फेब्रुवारी: क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड – रात्री 8:00 वाजता
23 फेब्रुवारी: मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर झाल्मी – रात्री 8:00 वाजता
24 फेब्रुवारी: लाहोर कलंदर विरुद्ध कराची किंग्ज – दुपारी 2:30
25 फेब्रुवारी: मुलतान सुलतान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स – रात्री 8:00 वाजता
25 फेब्रुवारी: लाहोर कलंदर विरुद्ध पेशावर झाल्मी – रात्री 8.00 वाजता
26 फेब्रुवारी: पेशावर झाल्मी विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड – रात्री 8.00 वाजता
27 फेब्रुवारी: लाहोर कलंदर विरुद्ध मुलतान सुलतान – रात्री 8.00 वाजता
28 फेब्रुवारी: कराची किंग्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड – रात्री 8:00 वाजता
29 फेब्रुवारी: कराची किंग्स विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स – रात्री 8:00 वाजता
2 मार्च: पेशावर झल्मी विरुद्ध लाहोर कलंदर – दुपारी 2:30
2 मार्च: इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स – रात्री 8:00 वाजता
३ मार्च: कराची किंग्स विरुद्ध मुलतान सुलतान – रात्री ८:००
4 मार्च: इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर झाल्मी – रात्री 8:00 वाजता
5 मार्च: पेशावर झल्मी विरुद्ध मुलतान सुलतान्स – रात्री 8:00 वाजता
6 मार्च: क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध कराची किंग्ज – दुपारी 2:30
6 मार्च: इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध लाहोर कलंदर – रात्री 8.00 वाजता
7 मार्च: इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध कराची किंग्ज – रात्री 8:00 वाजता
8 मार्च: पेशावर झाल्मी विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स – रात्री 8:00
9 मार्च: कराची किंग्स विरुद्ध लाहोर कलंदर – रात्री 8:00 वाजता
10 मार्च: इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध मुलतान सुलतान – दुपारी 2:30 वा
10 मार्च: क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध लाहोर कलंदर – रात्री 8:00 वाजता
11 मार्च: कराची किंग्स विरुद्ध पेशावर झाल्मी – रात्री 8.00 वाजता
12 मार्च: क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध मुलतान सुलतान – रात्री 8:00 वाजता
मार्च १४: पात्रता सामना – रात्री ८:००
15 मार्च: एलिमिनेटर 1 – रात्री 8:00 वा
16 मार्च: एलिमिनेटर 2 – रात्री 8:00 वा
18 मार्च: अंतिम सामना – रात्री 8:00 वा