आयपीएल नव्हे तर पीएसएल जगात सर्वश्रेष्ठ; आंद्रे रसेलचे धक्कादायक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेक देशांनी स्पर्धा आयोजित केल्या. पण आयपीएल ची सर कोणत्याच स्पर्धेला आली नाही. याच दरम्यान वेस्ट इंडीजचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने मात्र आयपीएल पेक्षा पाकिस्तान मधील पाकिस्तान सुपर लीग हीच स्पर्धा सर्वोत्कृष्ट असल्याचं धक्कादायक विधान केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आंद्रे रसेलला प्रश्न विचारण्यात आला की.,’तु जगातील अनेक टी-२० लीगमध्ये खेळतो. तर तुझ्या मते जगातील सर्वोत्कृष्ट लीग कोणती आहे?’ या प्रश्नावर उत्तर देताना आंद्रे रसेलने जगातील सर्वोत्तम लीग ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पाकिस्तान सुपर लीग ही आहे असे धक्कादायक उत्तर दिले,

तो म्हणाला ,’मी जगभरातील टी-२० लीग मध्ये सहभाग नोंदवला आहे. यात मला आयपीएलपेक्षा पीसीएल सर्वोत्कृष्ट वाटते कारण पीसीएलमध्ये उच्च गुणवत्ता असलेले गोलंदाज आहेत.’असे म्हणाला. दरम्यान रसेल हा आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स च प्रतिनिधित्व करतो. तर पाकिस्तान सुपर लीग मध्ये तो क्वेटा ग्लाडीऍण्डर कडून खेळतो.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment