हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात मोटार वाहन कर भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 21 वाहनांचा जाहिर ई लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केला जाणार आहे. दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव होणार आहे. संबंधित लिलावातील वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील आवारात व इतर ठिकाणी दि. 30 मे ते 9 जून 2023 दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जाहिर ई-लिलाव करण्यात येणाऱ्या संबंधित 21 वाहनांमध्ये आहेत. ऑटो रिक्षा – 6, टुरीस्ट टॅक्सी – 6, डी. व्हॅन (3W) – 4 व मोटार सायकल – 5 अशा वाहनांचा समावेश आहे. ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार सातारा, वाई, माण, कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, कराड, खंडाळा, महाड, आणि जावळी तसेच उप प्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहेत.
इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व इतर ठिकाणी करता येईल. जाहिर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 30 मे ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर दि. 12 ते 13 जून 2023 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे खटला विभागात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी फि रु 500/- (नापरतावा) आणि रु 1,00,000/- रक्कमेचा डी.डी. प्रत्येक एका लॉटसाठी व लिलावातील प्रत्येक एका वाहनासाठी रु 500/- प्रमाणे होणार आहे. एकत्रित रक्कमेचा “DY RTO SATARA “या नावे अनामत रक्कमेचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती. नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रूव्हल करुन घेणेसाठी सादर करणे गरजेचे असल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी सातारा दिली आहे.