Pulsar NS160 Vs Apache RTR 160 4V; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण Comparison

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाजने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात Pulsar NS160 आणि Pulsar NS200 चे अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे. या गाड्यांची थेट टक्कर TVS Apache RTR 160 4V शी होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या दोन्हींमधील कोणती गाडी घेऊ याबाबत गोंधळात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी या TVS Apache RTR 160 4V आणि Bajaj Pulsar NS160 या दोन्ही गाड्यांचे इंजिन, फीचर्स आणि किमतीबाबत तुलना करणार आहोत, या तुलनेनंतर तुम्हीच समजून घ्या की कोणती गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे.

डिझाईन –

दोन्ही गाड्यांच्या लूक आणि डिझाईन बाबत सांगायचं झाल्यास, अपडेट होऊनही कंपनीने पल्सर NS160 च्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. बाईकचा लूक अग्रेसिव नेकेड स्ट्रीटफाइटर सारखा आहे. दुसरीकडे TVS Apache RTR 160 4V सुद्धा पल्सरसारख्याच नेकेड स्ट्रीट फायटर डिझाइनसह येते. पण पल्सरच्या तुलनेत तिचा लूक म्हणावा तसा अग्रेसिव्ह वाटत नाही.

इंजिन-

इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, बजाज पल्सर NS160 17.03 bhp आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, TVS Apache RTR 160 4V इंजिन स्पोर्ट मोडमध्ये 17.31 bhp आणि 14.73 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईक ऑइल कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. दोन्ही मोटारसायकलचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.

फीचर्स –

अपडेटेड बजाज पल्सर NS160 मध्ये फ्यूल इकॉनोमी, गियर स्थिती, साइड कट ऑफ, ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टम यांसारखी फीचर्स आहेत. तसेच पल्सर NS160 मध्ये ब्रेकिंगसाठी, समोर 300 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 230 मिमी डिस्क मिळते. तर दुसरीकडे Apache RTR 160 4V ला LED लाइटिंग, राइडिंग मोड्स, सिंगल-चॅनल ABS, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्लाइड, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी फीचर्स मिळतात.

किंमत किती ?

दोन्ही गाड्यांच्या किमतीची तुलना करायची झाल्यास, बजाज पल्सर NS160 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 1.34 लाख रुपये आहे. तर दुसरीकडे, Apache RTR 160 4V च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.23 लाख रुपये आणि स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे.