अभिमानस्पद! पुलवामामध्ये शहिद मेजरची वीरपत्नी सैन्यात सामील होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास एका वर्षापूर्वी, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शहीद पतीच्या पार्थिवा समोर झुकून त्याच्या वीरपत्नीने कानात ‘आय लव्ह यू’ असं म्हणतांना पहाताना प्रत्येकाचे डोळे भरून आले होते. ज्या वर्दीत तिच्या पतीने देशासाठी कुर्बानी दिली होती आता तीच वर्दी घालण्यास ही वीरपत्नी सज्ज झाली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती धौंडियाल यांची विधवा निकिता कौल धोंडीयाल ह्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण झाल्या आहेत. आता त्या केवळ मेरिट लिस्टची वाट पाहत असून त्यानंतर निकिता भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत.

un (1)

मंगळवारी पुलवामा हल्ल्यावेळी मोहिमेदरम्यान शहिद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पहिली पुण्यतिथी होती. हल्ल्यानंतरच्या या एका वर्षात मेजर विभूती यांची पत्नी नितीकाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. निकिता सध्या नोएडामधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत असून त्या आता सैन्यात भरती होण्यास सज्ज झाली आहे.

सैन्यात सामील होण्याच्या निर्णयाचे सासूला दिले श्रेय
शहीद विभूती धौंडियाल यांची पत्नी नितिका सैन्यात नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. सैन्यात सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्व श्रेय नितीका आपल्या सासू सरोज धोंडियाल यांना देते. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी सैन्यात वूमन एंट्री स्कीमचा फॉर्म भरला होता. आपल्या धैर्याने आणि कठोर परिश्रमांमुळे आता त्यांनी वैद्यकीय चाचण्या आणि मुलाखतीची कसोटी सुद्धा पार केली आहे. नितीका म्हणाली की, मला केवळ मार्च महिन्याची प्रतीक्षा आहे जेव्हा मेरिट लिस्ट येईल.

सुनेच्या सैन्यात सामील होण्याच्या निर्णयावर सासू आहेत आनंदी
नितीका धौंडियाल यांच्या सैन्यात भरती होण्याच्या निर्णयामुळे शहीद मेजर विभूती धौंडियाल यांच्या आई सरोज धौंडियाल खूप खुश आहेत. आपल्या सुनेच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. सरोज यांनी सांगितले की, घरातील तीन बहिणींमध्ये धाकटा भाऊ असलेले शहीद मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या बलिदानाचा देशाला अभिमान आहे. जर आपल्या सुनेचा नितीका धौंडियाल यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर घरातील सूनसुद्धा सैन्यात लेफ्टनंट बनून देशाची सेवा करताना दिसणार या गोष्टीचा मला आणखी अभिमान वाटेल.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment