कारला धडकून लक्झरी बस झाली पलटी, अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे-अहमदनगर महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये लक्झरी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात घडला आहे. हा संपूर्ण अपघात त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिक्रापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले ?
लक्झरी बस ही पुण्याकडून नगरच्या दिशेने जात होती. यावेळी स्विफ्ट कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला आहे. लक्झरी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या धडकेमुळे बस महामार्गावर पलटी होऊन थेट हॉटेलमध्ये जाऊन घुसली.

कार चालकाचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात बस चालक, क्लिनर यांच्यासह पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. तर स्विफ्ट चालक विशाल सासवडे याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.