Pune Accident Update : पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुरेंद्र अग्रवाल याना अटक केली आहे. सदर अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याने गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal Arrested) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

यापूर्वी पुणे अपघात प्रकरणात सदर अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल याना अटक झाली होती, आता मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहे. कलम 365 आणि 368 कलम लावले आहे. त्यामुळं संपूर्ण अग्रवाल कुटुंबाचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत. अल्पवयीन मुलाकडून जेव्हा अपघात झाला. त्यावेळी ड्रायव्हर या मुलासोबत पुढच्या सीटवर बसला होता. हा अपघात झाल्यानंतर संबधित मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी ड्रायव्हरला सांगितले होते. त्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते अशीही माहिती समोर येत आहे.