Pune Airport : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल लवकरच प्रवासाच्या सेवेसाठी उपलब्ध होणार; विमानांची उड्डाणे आणि प्रवासीही वाढणार

Pune Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे विमानतळाचे (Pune Airport) नवीन  टर्मिनल लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी  उपलब्ध  होणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळावर  मिळणाऱ्या सुविधेत  भर  पडेल . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः ह्या कामावर  लक्ष  ठेऊन  आहेत. सध्या असलेल्या पुणे विमानतळवरील  पायाभूत  सुविधा प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत  असल्यामुळे नवीन टर्मिनल (New Terminal) इमारतीची  गरज  होती. ती गरज ह्या नव्या टर्मिनल सेवेत आल्यानंतर पुर्ण होईल. या नव्या टर्मिनल नंतर पुणे विमानतळावर दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. रोजच्या विमानांची संख्या ३० ने वाढेल तर प्रवाशांची संख्या १० हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे विमानतळावर गर्दीच्या हंगामात  मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करताना  दिसतात. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरी करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध ठिकाण असल्याने पुण्यात दरवर्षी लाखो लोक देशभरातून येत असतात. मात्र त्या प्रमाणात आवश्यक सुविधा  येथे नसल्याकारणाने  प्रवासी सुविधेवर ताण पडत  होता. मुख्यता विमानतळावरील सुरक्षेसंदर्भात अडचणी  निर्माण होत आहेत. सर्वांच्या सुरक्षा तपासणी करताना  वेळ लागत आहे. प्रवासाचे  सामान कॅनवेअर बेल्ट प्रवास्यांना मिळण्यासाठी लांबच  लांब रांगा लागत  आहेत. भारतीय  विमानतळ प्राधिकरण ने ही अडचण लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार, नवीन टर्मिनल विकासासाठी  525 कोटी अपेक्षित खर्च लागत  आहे.

काय फायदा होणार?

सध्याच्या टर्मिनलमधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग होत असून दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशी वाहतूक करतात. तर दुसरीकडे नवीन टर्मिनल झाल्यानंतर उड्डाणाची संख्या ३० ने वाढण्याची शक्यता असून प्रवासी लोकांची संख्याही १० हजारांनी वाढेल. तब्बल ६० हजार चौरस फूट क्षेत्रफळात विमानतळ विकास केला जाईल