पुणे – बँगलोर महामार्गावर वाहतुक कोंडी; दिवाळीची सुट्टी संपताच चाकरमान्याची पुण्या मुंबईकडे धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळी सणाच्या निमिताने मोठ्या संख्येने मुंबई- पुणे येथील चाकरमानी आपल्या कुटुंबियां समवेत गावाकडे आले आहेत. आता दिवाळी सण संपल्याने ते पुण्या मुंबईला परंतु लागले आहेत. आपल्या खासगी वाहनाने ते जात असल्याने पुणे – बँगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावर एक ते दोन किलो मीटरच्या लांबच-लांब रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे – मुंबई महामार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाका परिसरात रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत. विशेषतः चाकरमानी दिवाळीचे लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर परत मुंबईकडे जातात. दरम्यान शनिवार व रविवार सलग सुट्ट्या आल्याने गावाकडे आलेले चाकरमानी परत पुणे – मुंबईकडे परंतु लागले आहेत. दरम्यान आज कराड येथील कोल्हापूर नाका परिसरात पुणे – बँगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या एक ते दोन किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी आले होते. ते आता परत जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अशात सीएनजी गॅस महाग झाल्याने त्याचाही फटका वाहनधारकांना बसला आहे. सध्या सीएनजी गॅसचा दर हा 65 रुपये प्रति किलो इतका झाला  आहे.

Leave a Comment