पुणे-बेंगलोर महामार्गावर भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; २ ठार, ६ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । पुणे-बेंगलोर महामार्गावर ओमनी व्हॅन आणि उसाच्या ट्रॉलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर मधील दोघे जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या सविस्तर महतीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावर देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांची ओमनी व्हॅन आणि उसाच्या ट्रॉलीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात कर्नाटकातील अप्पाचीवाडीजवळ झाला. या अपघातात ओमनी व्हॅनमधील सूरज सुलताने, श्रेया लागू यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिष नितीन साळवी, आर्या केदार कुलकर्णी, अमृता नितीन साळवी, मिना सुभाष सुलताने, पूर्णिमा सतिश पंडित, सूमेदा विजयकुमार लागू जखमी झाले.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाचारण कार्यात आले. दरम्यान, या घटनेतील मृतक सामाजिक कार्यकर्ते सूरज सुलताने यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी देहदानाचा संकल्प करणाऱ्या सूरजच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; 90 दिवसांत होणार काम पूर्ण

कोल्हापूर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा बंदीचा आदेश

सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार

Leave a Comment