पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहेत. कुटुंबीयातील अन्य सदस्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची त्यांनी माहिती दिली. मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.
गेल्या शनिवारी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आलं होत. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते.
Today me and my mother have been tested positive for Covid-19.
We both are not showing any symptoms & have been advised by doctors to be under home quarantine & have thus self-isolated.
All other family members have been tested negative.
Stay Home, Stay Safe
— Mukta Tilak (@mukta_tilak) July 7, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”