पुणे पुस्तक महोत्सवाने केला नवा रेकॉर्ड; पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे तिथे काय उणे… पुणे शहराने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रमाची नोंद करून पुणे शहरासाठी उणे ठरणारी बाब देखील नाहीसी केली. याआधी चीन देश्याच्या नावावर असलेला विश्वविक्रम पुणे शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मोडीस काढला व गुरुवारी भारताच्या नावावर करून घेतला. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात त्यामुळे वाचनाबाबताची आवड नवीन पिढीत जोपसली गेली पाहिजे या उद्देशातून पुणे शहरांत पुणे मनपा आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव सुरु आहे. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आणि ‘पुणे महानगरपालिका’ आयोजित ‘बालक-पालक’ हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला.

गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर :

बालक -पालक’ हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे शहराने विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. विश्व रेकॉर्ड नुसार एकाच वेळी ३ हजार ६६ पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगितल्या. क्षिपा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करु नका पुस्तकातील गोष्ट सांगण्यात आली त्यावेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाल्याचे जाहीर केले. यापूर्वी २०१५ मध्ये चीनमध्ये २ हजार ४७९ मुलांना पालकांनी गोष्टी सांगण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता.

देशपातळीवर  पंतप्रधानांनी घेतली विश्वविक्रमाची दखल  :

वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याबाबत पुण्यात नोंदवल्या गेलेल्या विश्वविक्रमाची दखल घेतली. पुणे महानगरपालिका ने घेतलेल्या ‘ बालक-पालक’ हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. वाचनाचा आनंद पोचवण्यासाठीचे हे सर्व प्रयत्न नक्कीच कौतुक करण्यासारखं असल्याचे मोदींनी म्हंटल.