Pune Bus Service : पुण्यातून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बस; वेळापत्रक आणि तिकीट दर पहा

Pune Bus Service
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Bus Service ।पुण्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील हिंजेवाडी येथून छत्रपती संभाजीनगर पर्यंत नवीन बससेवा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शुक्रवार, ६ जून २०२५ पासून हि बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्क फेज 3 ते छत्रपती संभाजी नगर असा हा रूट आहे. हि एक शिवनेरी बस असेल जी प्रवाशांना आरामदायी प्रवास देईल. या नवीन बससेवेमुळे हिंजेवाडी परिसरात राहणाऱ्या आणि मूळचे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बऱ्याच दिवसापासून मागणी –

हिंजवडी येथे आयटी पार्क असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी नोकरीसाठी नोकरदार वर्ग येत असतो. त्यामुळे इथली नागरी वस्तीही वाढली आहे. हिंजेवाडी परिसरात छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर भागातूनही मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. सुट्टीच्या दिवशी हे लोक गावी जातात.. मात्र त्यासाठी त्यांना शिवाजीनगर किंवा स्वारगेटला जावे लागत… त्यामुळे थेट हिंजेवाडी मधूनच डायरेक्ट बस असावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होत होती. अखेर ती मागणी पूर्ण झाली असून प्रवासांचा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे.

कस असेल बसचे वेळापत्रक? Pune Bus Service

हिंजवडी आयटी पार्क फेज 3 ते छत्रपती संभाजी नगर बस (Pune Bus Service) आठवड्याच्या शुक्रवारी संध्याकाळी ६:०० वाजता हिंजवडी फेज-३ येथून निघेल आणि दर सोमवारी पहाटे ४:३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून परत येईल. विकेंडला मूळ गावी जाणाऱ्या आणि सोमवारी पुन्हा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. त्यांना सोयिस्कर असच बसचे तिकीट ठेवण्यात आलं आहे.

तिकीट दर किती?

पुरुष: ९६८ रुपये
महिला: ५११ रुपये
ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील): ५११ रुपये
ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील): मोफत

संभाजीनगर सेवेव्यतिरिक्त, एमएसआरटीसीने हिंजवडी फेज-३ ते कोल्हापूर आणि हिंजवडी फेज-३ ते नाशिक अशा आणखी २ बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. हा प्रवासही शिवनेरी बसमधून करता येणार आहे. कोल्हापूरला जायचं असल्याचं दर शुक्रवारी दुपारी ४:४५ वाजता हिंजवडीहून बस आहे. हि बस सोमवारी पहाटे ४:०० वाजता परत येईल. तर नाशिकला जायचं असल्यास, हिंजवडीहून दर शुक्रवारी संध्याकाळी ५:०० वाजता बस असेल हि बस (Pune Bus Service) सोमवारी पहाटे ४:०० वाजता परत येईल. हिंजवडी मधून सुरु झालेल्या या नव्या बससेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.