शिरूर प्रतिनिधी |पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या मध्ये दोन सख्या भावांचा आणि आईसह २० दिवसांच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शिरूर बायपास पाचरणे मळा या ठिकाणी घडला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्याकंटेनरला कार मागून येवून धडकल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. किशोर हाके (वय 32 वर्ष), शुभम हाके (वय 25 वर्ष)विमल माधव अशी मृतांची नावे असून पुष्पा हाके या गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दगावलेला २० दिवसांचा मुलगा हा किशोर हाके यांचा होता. आपल्या मुलाला आणि बायकोला आणण्यासाठी आई आणि भावासहित गेले होते. औरंगाबादहून वाघोलीकडे निघाल्यानंतर पाहटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार शिरूर बायपास पाचरणे मळा येथे येताच उभा असणाऱ्या कंटेनरवर कार आदळली. अपघात एवढा भीषण होता कि अर्धा किलोमीटर पर्यत या अपघाताचा आवाज लोकांना ऐकू आला आहे. दरम्यान शिरूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.