पुणे । माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील औंध परिसरात एकाला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अमन अजय चड्डा (वय २८ , रा. भाऊ पाटील रोड, पुणे. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांच्या तक्रारीवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमन चड्डा यांच्या तक्रारीनुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार चड्डा यांचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले.
त्यानंतर देखील आरोपींनी संगनमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. या प्रकरणी चड्डा यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.
विधिमंडळात राडा! आमदारांनी सभापतींना धरून खुर्चीतून खेचलं खाली
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/cY6ovyZYZr#HelloMaharashtra @INCMaharashtra @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
निवडणुकीनंतरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर जानकर संतापले, म्हणाले..
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/aaMS37Nh4N#HelloMaharashtra @MahadevJankarR @CMOMaharashtra @ShivSena— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
‘.. तर त्या फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं’; शिवसेनेचा घणाघात
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/w3GY4x6wwq
@GopichandP_MLC@BJP4Maharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra @CMOMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
आंदोलन दिल्लीत, पंतप्रधान मोदी घेणार गुजरातमधील कच्छच्या शेतकऱ्यांची भेट
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/ZZrNVbLwsI@narendramodi @PMOIndia #farmersrprotest #FarmerProtestHijacked #FarmBills2020 #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’