पुणेकरांनो सावधान! कोरोना पुन्हा फोफावतोय; ‘हे’ आहेत शहरातील हॉटस्पॉट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । गेले काही दिवस पुण्यातील कोरोनाची (Pune coronavirus) आकडेवारी दिलासादायक होती. पण आता कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. पुण्यातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. पण आता मात्र पुण्याचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. पुण्यात कोरोनाने आपले नवे हॉटस्पॉट तयार केले आहेत. जुन्या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण या नव्या हॉटस्पॉटमध्ये झपाट्यानं रुग्ण वाढत आहेत. सिंहगड परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

सिंहगड परिसर, बिबवेवाडी, अहमदनगर रोड,वारजे – कर्वेनगर, हडपसर- मुंढवा, कोथरूड – बावधन, ढोले पाटील रोड या परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी या ठिकाणी जाणं टाळायला हवं. शिवाय घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारीदेखील घ्यायला हवी. कोरोना नियमांचं पालन करा. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगही ठेवा. जेणेकरून कोरोनाचा धोका टाळता येईल आणि पुन्हा डोकं वर काढणाऱ्या कोरोनाला थोपवता येईल.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार पुण्यातील हॉटस्पॉटमध्ये आढळलेले रुग्ण

सिंहगड परिसर – 44 रुग्ण

बिबवेवाडी – 39 रुग्ण

नगररोड – वडगाव शेरी – 37 रुग्ण

वारजे – कर्वेनगर – 36 रुग्ण

हडपसर- मुंढवा – 33 रुग्ण

कोथरूड – बावधन – 27 रुग्ण

ढोले पाटील रोड – 11 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील स्थिती
कोरोना बाधित रुग्णांची संख्या 393231

बरे झालेले रुग्ण – 279453

उपचार सुरू असलेले रुग्ण – 4726

मृत्यू – 9052

मृत्यूचं प्रमाण – 2.30

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 96.50.

Leave a Comment