पुण्यात 11 वर्षीय मुलासह ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला तरी अजूनपर्यंत राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहेत. कोरोनाचे केंद्र बनलेल्या पुणे जिल्ह्यात आज मंगळवारी 99 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत एकूण 2हजार202 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे पुण्यात आज 11 वर्षीय मुलासह ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 119 इतकी झाली आहे. मृतांची वाढणारी संख्या प्रशासनाच्या चिंतेत दररोज भर टाकत आहे. पुणे विभागातील पुणे 102, पुणे मनपात 1 हजार 796 तर पिंपरी-चिंचवड मनपामध्ये 120 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. कोरोनामुळे अनेक वसाहती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग अनेकांना होत आहे. त्यात काळजीची बाब म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यातील मृतांची संख्याही आता दिवसेंदिवस वाढ लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment