व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी आत्महत्या केली आहे. राजेश सापते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी आपल्या त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राजेश सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment