Pune Crime । एकीकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्यात मात्र पाकिस्तान जिंदाबादचा नारा देण्यात आला आहे, तसेच सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा शेअर करण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल रत्नागिरीत सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला होता, तिथेही मोहम्मद नावाच्या तरुणाने पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला होता, त्याला सदर परिसरातील मुलांनी कपडे फाटेपर्यंत मारला होता. तसेच त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुण्यातही असेही घडल्याने खळबळ उडाली आहे. भारतात राहून पाकिस्तानचा पुळका असणाऱ्या अशा वृत्तीचं करायचं तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय.
सोशल मिडिया हॅण्डल वर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट – Pune Crime
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या सोशल मिडिया हॅण्डल वर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट लिहिली. खदिजा शेख असं या तरुणीचे नाव असून ती सिंहगड महाविद्यालयात शिकत असल्याचं बोललं जातंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सकल हिंदू समाज या पेजने पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. तरुणीने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्यात आल्याचा दावा सकल हिंदू समाजने केला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तिला बेड्या ठोकण्यात (Pune Crime) आल्या आहेत. दुसरीकडे, महाविद्यालयानेही या तरुणीवर कारवाई करत तिला काढून टाकलं आहे.
रत्नागिरीतही पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स –
काल रत्नागिरीत सुद्धा एका मुस्लिम तरुणाने पाकिस्तान जिंदाबादचे स्टेट्स ठेवले होते. मोहम्मद बदरुद्दीन परकार असं सदर तरुणाचे नाव असून त्याने पाकिस्तान प्रेम दाखवलं. मोहम्मदने बुधवारी रात्री आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपवर पाकिस्तान झिंदाबाद’ असा स्टेट्स ठेवला. तसेच भारतविरोधी व धर्मविरोधी स्टेटस ठेवले. हि गोष्ट त्याचा परिसरात राहणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यानंतर संतापलेल्या तरुणांनी गुरुवारी दुपारी मोहम्मद परकारला जांफूळफाटा येथे बोलावले आणि असा स्टेट्स का ठेवला याबाबत जाब विचारला. आपण आपल्या मनाने पाकिस्तान जिंदाबादचा स्टेट्स ठेवल्याचे मोहम्मदने कबूल केलं आणि तिथेच मग त्याला चोप बसला. तसेच याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात देश विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी मोहम्मद परकार विरोधात भादंवि कायदा कलम ३२४ तसेच १५३ अन्वये गुन्हा दाखल केलाय.




