Thursday, February 2, 2023

धक्कादायक ! वर्गशिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनिसोबत केले अश्लील चाळे

- Advertisement -

हडपसर : हॅलो महाराष्ट्र – हडपसरमधील एका नावाजलेल्या शाळेत एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका वर्गशिक्षकानेच शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. संजय आत्माराम साळुंके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. संजय याच्या विरोधात १४ वर्षांच्या मुलीने तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना हडपसरमधील माळवाडी परिसरातील एका नावाजलेल्या शाळेत घडली आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये फिर्यादी मुलगी इयत्ता सहावीच्या शिक्षण घेत होती. त्यावेळी संजय साळुके याने सहलीदरम्यान मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या शिक्षकाने वर्गातील अल्पवयीन मुलींकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, कारण नसताना जवळ बोलाविणे असे प्रकार करीत विनयभंग केला होता.

- Advertisement -

तसेच याने शाळेतील इतर मुलींनासुद्धा अशीच वागणूक देत विनयभंग केला होता. यानंतर फिर्यादीने तक्रार केल्यानंतर शिक्षिकाविरूद्ध विनयभंग आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.