पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ते उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील आहेत.आयएएस बनल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग नांदेड मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत सीइओ आणि त्यांनतर बीड आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. औरंगाबाद मधील कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले होते.

त्यानंतर २०१८ मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. पुण्यात आल्यानंतर कोरेगाव भीमा रण स्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाचं नेटकेपणानं नियोजन त्यांनी केलं. वर्षभरापूर्वी झालेल्या दंगलीमुळे कोरेगाव भीमा हा संवेदनशील विषय बनला होता. नवलकिशोर राम यांनी तो इतक्यात संवेदनशीलतेने हाताळला.

पुण्यामध्ये गेल्या वर्षी आलेला महापूर तसेच पावसाळ्यातील दुर्घटनांचा वेळी नवलकिशोर राम यांची कार्यक्षमता दिसून आली. सध्या कोरोनाच संकट असताना परिस्थिती हाताळत असताना जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम हे राबवत असलेल्या उपायोजना प्रभावी ठरताहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवलकिशोर यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले आय ए एस अधिकारी श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्यासाठी खास बोलावून घेण्यात आलं होतं. फेम इंडिया एशिया पोस्ट ने केलेल्या सर्वेक्षणानुसार नवल किशोर राम यांचा देशातील ५० लोकप्रिय जिल्हाधिकार्‍यांनी मध्ये समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”