धक्कादायक ! पुण्यात डॉक्टर्स डेच्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज सगळीकडे डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. पण आजच्या दिवशी पुण्यातील वानवडी येथील आझादनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर असे मृत डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे.

काळ रात्री पत्नी अंकिता हिने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. हा धक्का सहन न झाल्याने डॉक्टर पतीनेदेखील आज आत्महत्या केली आहे. अशी माहिती वानवडी पोलिसांकडून देण्यात आली आहे. 30 तारखेला रात्री 26 वर्षीय डॉ. अंकिता शेंडकर यांनी राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली.

यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने 28 वर्षीय निखिल शेंडकर याने देखील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment