Pune Ganeshotsav Special Buses : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून 250 हुन अधिक स्पेशल बसेस

Pune Ganeshotsav Special Buses
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ganeshotsav Special Buses । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून आत्तापर्यंत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. गणेशोत्सव म्हंटल कि मुंबई पुण्यात असलेली चाकरमानी मूळगावी हमखास जाणार म्हणजे जाणारच… खास करून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. अशावेळी प्रवासी वाहतुकीवर जास्त ताण पडू नये आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ५००० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आत याच अंतर्गत पुण्याहून २५० हुन अधिक स्पेशल बसेस कोकणच्या दिशेने धावणार आहेत.

कोणत्या डेपोतून धावणार- Pune Ganeshotsav Special Buses

कोकणातून पुण्याला नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मूळगावी जाताना कसलाही त्रास होऊ नये म्हणून या विशेष बस चालवण्यात येणार आहेत. गणेश चतुर्थीच्या पाच दिवस आधी २२ ऑगस्टपासून २५० ते ३०० विशेष एसटी बसेस (Pune Ganeshotsav Special Buses) धावतील. या स्पेशल बसेस पुण्यातील स्वारगेट आणि चिंचवड डेपोमधून चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, देवरुख, मंडणगड, तिवरे, लांजा आणि सिंधुदुर्ग यासारख्या प्रमुख कोकण शहरांमध्ये धावतील. जास्त मागणीमुळे, नियमित बसेसमधील जागा जवळजवळ दोन महिने आधीच बुक करण्यात आल्या होत्या. वाढती गर्दी लक्षात घेता, एमएसआरटीसी पुणे विभागाने अतिरिक्त सेवांचे वेळापत्रक तयार केले आहे आणि प्रवाशांना लवकर आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी, पुणे विभागाने गणेशोत्सवानिमित्त २५१ अतिरिक्त बसेस चालवल्या, ज्यामुळे ५९.७५ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला होता.

राज्यभरातून ५००० स्पेशल बसेस-

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी राज्यभरातून तब्बल ५००० स्पेशल एसटी बस सेवा सुरु करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीं काही दिवसांपूर्वी केली होती. गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमारे 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.