Pune Ganpati Special Trains : पुण्याहून कोकणात 12 स्पेशल ट्रेन!! कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

Pune Ganpati Special Trains
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ganpati Special Trains येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव म्हंटल कि मुंबई पुण्यासारख्या शहरात कामाला असणाऱ्या चाकरमान्यांची पाऊले हि आपल्या मूळगावी वळतातच. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. साहजिकच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही जास्त असते. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही रखडलं असल्याने अनेक भाविक रस्ते मार्गाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनही यासाठी सज्ज झालं आहे. मुंबई पुण्यातून कोकणासाठी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेल्वेबाबत सांगणार आहोत जी पुण्याहून कोकणासाठी धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक कस आहे? ती कुठून कुठपर्यंत धावेल याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबाबत सांगतोय ती आहे पुणे ते रत्नागिरी रेल्वे… कोकणातून पुण्याला कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त आलेल्या लोकांसाठी हि विशेष ट्रेन (Pune Ganpati Special Trains) सुरु करण्यात आली आहे. या स्पेशल रेल्वेमुळे गणेशोत्वाला पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. मध्य रेल्वे वातानुकूलित आणि विना वातानुकूलित अशा १२ रेल्वेगाड्या पुणे रत्नागिरी मार्गावर चालवणार आहे.

सहा नॉन-एसी साप्ताहिक विशेष गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक ०१४४७ हि २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४८८ त्याच तारखेला सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.

याव्यतिरिक्त, सहा एसी साप्ताहिक विशेष गाड्या सुद्धा धावतील. त्यामध्ये ट्रेन क्रमांक ०१४४५ ही एसी रेल्वे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता पुण्यातून निघेल आणि सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४४६ त्याच तारखेला सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पुण्यात पोहोचेल. Pune Ganpati Special Trains

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा – Pune Ganpati Special Trains

या सर्वच्या सर्व १२ विशेष ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या रेल्वे स्थानकांवर थांबतील.