पुणे । राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. यामध्ये पुणे पदवीधर (Pune constituency) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun lad) यांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख (BJP Sangram Deshmukh) पिछाडीवर आहेत. अशात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत.
पुण्यात सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी हे बॅनर लावले आहेत. निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती येण्यास संध्याकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतं बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळी पहिला कल हाती येईल आणि मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास 36 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्यातरी हाती आलेल्या निकालांनुसार, अरुण लाड हे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता ही चुरस आणखी वाढणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’