चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा ; अरुण लाड यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचा गड असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला  महाविकास आघाडीने सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला आहे.

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण ते दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते, पण ज्या पदवीधरांच्या जीवावर ते निवडून गेले होते, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांनी टीव्हीवर मुलाखत दिली, की मी दोन वेळा निवडून आलो आहे, माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या. पण तुम्ही काही कामच केलं नाही, तर देशमुखांना काय निवडून द्यायचं. लोकांना हे पटलं नाही, आपल्यावर झालेला अन्याय खटकला. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिलं.” अशी प्रतिक्रिया अरुण लाड यांनी दिली .

पदवीधर निवडणुकीचा हा निकाल म्हणजे भाजपला जसा धक्का आहे, त्यापेक्षा अधिक धक्का चंद्रकांत पाटलांना आहे. कारण ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा किंबहुना चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment