व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ओव्हरटेकिंग करणे बाईकस्वाराच्या आले अंगलट, भयानक अपघाताचा Video आला समोर

मावळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात अपघाताचे (bike accident) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका बाइकस्वाराला ओव्हरटेक करणे (bike accident) महागात पडले आहे. या अपघातात बाईकस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. हि अपघाताची (bike accident) घटना पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली आहे.

या अपघातात (bike accident) बाळू गेणू शिळवणे हा दुचाकीचालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो या अपघातातून (bike accident) वाचला आहे. तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून कार च्या फ्रंट कॅमेऱ्यात हि संपूर्ण अपघाताची घटना कैद झाली आहे.

बाळू गेणू शिळवणे हे आपल्या स्पेंलडर दुचाकीवरून भरधाव वेगाने तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते. समोर एक कंटेनर होता, त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या इराद्याने शिळवणे यांनी सुसाटपणे ओव्हरटेक केला. पण, त्याच वेळी समोरून एक भरधाव कार आली. अचानक कार समोर आल्यानंतर शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. पण, अंतर कमी पडले आणि दुचाकी कारला धडकल्यामुळे हा अपघात (bike accident) झाला.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!
ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य