Saturday, June 3, 2023

उद्यापासून पुणे अनलॉक!! महापौरांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. मात्र पुण्यात कोरोनाचे प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी निर्बंधात शिथिलता द्यावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार असून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4पर्यंत परवानगी देण्यात आली असून मॉल रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येणार. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाईल.

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दुकानांच्या वेळाही वाढवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पुण्यात दुकाने हि सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.