Pune Metro : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेत बदल ; घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

0
1
pune metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : पुणेकरांच्या रोजच्या जीवनामध्ये मेट्रो सेवेचा चांगला परिणाम होत आहे. मेट्रो सेवेमुळे नोकरीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. एवढेच नाही तर पुणेकरांची सुद्धा मेट्रोला चांगली पसंती मिळत आहे. शिवाय महामेट्रोला सुद्धा यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. पुणे मेट्रोच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आता हाती आली असून स्वारगेट ते कात्रज ही मेट्रोमार्गिका धनकवडी येथील शंकर महाराज समाधीच्या खालून जात असल्याने या मार्गामध्ये थोडा बदल करण्याचा आश्वासन महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (Pune Metro) कडून देण्यात आले आहे. सद्गुरू शंकर महाराज समाधीला धोका पोहोचवण्याची शक्यता असल्याने हा मार्ग बदलण्याची मागणी सद्गुरु संतवऱ्य योगीराज शंकर महाराज ट्रस्टची होती. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रस्टची विनंती मान्य (Pune Metro)

पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारण्याचं काम सध्या सुरू आहे. मेट्रोच्या कामाला गती देखील देण्यात आलेली आहे. याशिवाय नवीन मेट्रोमार्गाबद्दल सुद्धा जोरदार आखणी सुरू आहे. कात्रज हा 5.1 किलोमीटर लांबीचा भुयारी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून सविस्तर प्रकल्प अहवालानुसार लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. हा मार्ग धनकवडी येथील सद्गुरु श्री शंकर महाराज समाधी खालून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे समाधीला धोका निर्माण होण्याची शक्यता इथल्या ट्रस्ट कडून वर्तवण्यात आली होती. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मार्गिकेत बदल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मेट्रो आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर मार्गिकेत बदल केला जाणार असल्याचं महा मेट्रोचे (Pune Metro) कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितलं.

नाव बदलण्याबाबत विचार नाही (Pune Metro)

याबरोबरच पुढे बोलताना गाडगीळ यांनी सांगितलं की सहकार नगर येथील प्रस्तावित मेट्रोस्थानकासाठी सद्गुरु शंकर महाराजांचे नाव देण्याबाबत किंवा नावात बदल करण्याबाबतची कार्यवाही सरकारी पातळीवर करण्यात येईल असे ते (Pune Metro) म्हणाले.

दरम्यान स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाच्या मालिकेत बदल करण्यात आलेला नाही. मार्गिका समाधी खालूनच जात असल्याने त्या ठिकाणी थोडा बदल केला जाणार आहे. धनकवडी सहकार नगर कात्रज या ठिकाणच्या मालमत्तेला धोका पोहोचणार नाही याचीही काळजी घेतली जाईल अशी माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.