Pune Metro : पुणे मेट्रोचा विस्तार!! आता थेट चांदणी चौक, वाघोलीपर्यंत धावणार

Pune Metro wagholi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro। केंद्र सरकारने पुणेकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. लवकरच पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली, ज्यामुळे सध्याच्या वनाझ-रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विस्तारीकरणात वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी अशा २ मेट्रो लाईन सुरु होतील . ३३ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो विस्तारीकरणाला जवळपास ३६२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

13 स्थानकांचा समावेश- Pune Metro

वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हे दोन्ही कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचे असतील आणि त्यात १३ स्थानकांचा समावेश असेल. हि मेट्रो चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली अशा उपनगरांना जोडेल. अधिकृत निवेदनानुसार, दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३,६२६.२४ कोटी रुपये आहे. या खर्चात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बहुपक्षीय संस्था यांचा समान वाटा राहील. पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडॉर सुरु राहणार आहे. तसेच हे नवीन कॉरिडोर, डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज स्थानकाला निगडी- कात्रज या मार्गिका १ आणि हिंजवडी – डिस्ट्रिक्ट कोर्ट या मार्गिका ३ शी जोडतील.

मेट्रोचे (Pune Metro) हे विस्तारीकरण पुण्यातील प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांतील लोकांसाठी गेम चेन्जर ठरणार आहे. कारण यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक आणि नेटवर्कमधील प्रवाशांचा आकडाही वाढवेल. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) हा प्रकल्प राबवेल आणि सर्व नागरी, इलेक्ट्रोमेकॅनिकल आणि संबंधित कामे पूर्ण करेल.

नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-१ (निगडी-कात्रज) आणि लाईन-३ (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सह एकत्रित केले जातील. दीर्घकालीन गतिशीलता योजनेअंतर्गत, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या शहरांमधून येणाऱ्या आंतरशहर बस सेवा देखील चांदणी चौक मेट्रो स्टेशनवर येतील, तर अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस वाघोली स्टेशनवर येतील. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल, आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येईल.