हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro Extension । पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने रामवाडी आणि वाघोली दरम्यान मेट्रो कॉरिडॉर बांधण्यास मंजुरी दिल्यानंतर,आता शहराच्या पूर्वेकडील भागात वाहतूक आणखी मजबूत करण्यासाठी आता हा रूट थेट आळंदीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील मेट्रोचा विस्तार आळंदीपर्यंत केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. प्रस्तावित विस्ताराचा व्यवहार्यता अभ्यास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
भाविकांचा प्रवास सोप्पा होईल- Pune Metro Extension
मुरलीधर मोहोळ यांनी विश्रांतवाडी येथील जनता दरबारात बोलताना सांगितलं कि, त्यांनी या मेट्रो विस्ताराबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने हा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल. आळंदी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, अशावेळी आळंदी सारख्या भागात मेट्रोचा विस्तार केल्याने फक्त भाविकांनाच नव्हे तर त्याठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनाही मोठा फायदा होईल. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागातून आळंदीला सतत भाविकांची ये-जा पाहायला मिळते. त्यामुळे थेट आळंदी पर्यंत मेट्रो (Pune Metro Extension) आली तर या भाविकांचा प्रवास सोप्पा होईल असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल तर जलद शहरीकरण आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आधीच वैतागलेल्या स्थानिक रहिवाशांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दुसरीकडे आळंदीला मेट्रो (Pune Metro Extension) जोडणीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अनिल टिंगरे यांनीही आनंद व्यक्त केला. या मेट्रो विस्तारामुळे केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणे शक्य होणार नाही तर लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचणे शक्य होईल. आपण यापूर्वी अधिकाऱ्यांना विश्रांतवाडी चौकातील चालू उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची विनंती केली होती जेणेकरून ते प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंटशी जुळणार नाही. “मेट्रो मार्ग सुरळीतपणे पार पडावा यासाठी आम्ही काही डिझाइन बदल सुचवले आहेत. या मुद्द्यावर मुरलीधर मोहोळ आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत असं टिंगरे यांनी स्पष्ट केले.




