हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. आता मेट्रोतून अगदी मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी पुणे मेट्रो कडून ‘एक पुणे विद्यार्थी पास कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत, पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. या योजनेमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पैशाची बचत होणार आहे. तसेच मेट्रो प्रवासही चालना मिळणार आहे.
कशी काम करेल योजना – Pune Metro
पुणे मेट्रोची (Pune Metro) दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० हजार पेक्ष्या जास्त आहे. यामध्ये शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुद्धा नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे विद्यार्थी पास कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. सध्या , विद्यार्थी पास कार्डसाठी ११८ रुपये मोजावे लागतात. परंतु हाच पास २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत दिला जाईल. परंतु यासाठी , विद्यार्थ्यांनी किमान ₹२०० च्या टॉप-अपसह कार्ड रिचार्ज करावे लागेल, जे कोणत्याही कपातीशिवाय किंवा शुल्काशिवाय कार्डमध्ये पूर्णपणे जमा केले जाईल.
या पासचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाच्या वैधतेदरम्यान सर्व मेट्रो राईड्सवर ३०% सूट सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी प्रवास करणे सोपे आणि परवडणारे बनवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि पुण्यातील विद्यार्थी समुदायासाठी एक सहाय्यक आणि समावेशक वातावरण निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच मोफत प्रवासामुळे विद्यार्थ्यांची प्रवासी संख्याही वाढेल आणि मेट्रोला (Pune Metro) चालना सुद्धा मिळेल.
पुणे मेट्रोचा विस्तार होणार –
दरम्यान, पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी आता या मेट्रोचा विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोला आणखी १२ नवीन सेट मिळणार आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील. पुणे मेट्रोने टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेड आणि टीटागड फायरमा यांच्याकडून या १२ ट्रेन सेटसाठी खरेदी ऑर्डर दिली आहे. हे नवीन ट्रेन सेट पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केले जातील आणि विद्यमान रेकप्रमाणेच अॅल्युमिनियमपासून बनवले जातील.
पुणे मेट्रोच्या नेटवर्कच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज पर्यंत विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, पीसीएमसी-निगडी मार्गाचे बांधकाम आधीच वेगाने सुरू आहे. स्वारगेट-कात्रज कॉरिडॉरसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या दोन आगामी मार्गांवरील कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी, पुणे मेट्रोला १२ नवीन मेट्रो ट्रेन सेटची आवश्यकता असेल. एकूण सर्व मेट्रो सेट खरेदीचा खर्च ४३०.५३ कोटी रुपये आहे. पुढील ३० महिन्यांत या गाड्यांची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाईल.




