Pune Metro : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या मार्गिकेवरील मेट्रोसाठी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यानंतर तब्बल 52 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी या मार्गाचा वापर केल्याची माहिती मिळते आहे.
4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) अधिकाऱ्यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार दिनांक सहा आणि सात मार्च रोजी प्रवाशांनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाला चांगला प्रतिसाद दिला आहे. केवळ या दोनच दिवसात तब्बल 52 हजार 763 प्रवाशांची नोंदणी झाली असून त्यातून मेट्रोला 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या काळात देखील आणखी प्रवाशांची संख्या वाढेल असा अंदाज मेट्रोच्या व्यवस्थापनाकडून व्यक्त केला जातोय.
दरम्यान वनाज ते रामवाडी या 15 किलोमीटर मार्गावर (Pune Metro) 15 स्थानक आहेत. तर रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गावर बंडगार्डन, येरवडा कल्याणी नगर आणि रामवाडी अशी स्थानक आहेत. पीसीएमसी ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा आणि वनाज ते गरवारे कॉलेज या पाच किलोमीटरच्या भागाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च 2022 रोजी करण्यात आलं होतं. त्यानंतर 1 ऑगस्ट 2023 रोजी गरवारे कॉलेज येथे रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते सिविल कोर्ट या पुणे मेट्रोचा (Pune Metro) उद्घाटन त्यांनी केलं होतं.
आता तुम्ही जर तिकिटाच्या बाबतीत विचार करत असाल तर वनात ते रामवाडी तीस रुपये तिकीट आहे आणि रुबी हॉल ते रामवाडी 20 रुपये तिकीट मेट्रोसाठी (Pune Metro) आकारण्यात येत आहे.