Pune Metro : पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आता लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. त्याला देखील पुणेकरांचा (Pune Metro) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु होण्याची शक्यता
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या गणेशोत्सवाच्या आधीच ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठीचे नियोजन महामेट्रो कडून करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम 95% पर्यंत पूर्ण झालं असून जुलै अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी म्हणजेच गणेशोत्सवाच्या आधी हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. जी बाब पुणेकरांसाठी (Pune Metro) अत्यंत दिलासादायक आहे.
मार्गावर ‘या’ स्थानकांचा समावेश (Pune Metro)
यामध्ये तीन स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असतील. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा आहे . या भुयारी मार्गाची चाचणी ही फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली असून यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग हा मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्रा खालून मेट्रो धावणार आहे. या मार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित काम जुलै अखेरीस पूर्ण करण्याचा महामेट्रोचे नियोजन असल्याची (Pune Metro) माहिती आहे.
उर्वरित कामे पूर्ण झाली तर त्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना तपासणीसाठी बोलवण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करून त्याला अंतिम मंजुरी देतील आणि मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो कडून राज्य सरकारकडे या मार्गावर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात या मार्गावर सेवा सुरू (Pune Metro) होण्याची शक्यता आहे.
याबाबत एका माध्यमाला माहिती देताना महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (Pune Metro) मेट्रो मार्गाचे काम 95% पूर्ण झाले हे काम जुलै च्या अखेर पर्यंत पूर्ण होईल या मार्गावरील सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.