Pune Metro : पुणे मेट्रोसाठी नवे पर्याय; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार, या भागांना फायदा

0
1
pune metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : अगदी अल्पावधीतच पुण्यातील मेट्रो लोकप्रिय झाली असून यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे एवढेच नाही तर पुणेकर मोठ्यासंख्येने मेट्रोचा वापरही करताना दिसत आहेत. म्हणूनच मेट्रोने संपूर्ण पुणे शहराला कनेक्टिव्हिटी मिळवी असा सूर पुणेकरांमधूनही (Pune Metro) उमटत आहे. आता पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काही पर्याय सुचवले आहेत, ज्यामुळे मेट्रो सेवा पुण्यातील बहुतांश भागांपर्यंत पोहोचणार आहे. मोहोळ यांनी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर यांच्याशी बैठक केली आणि महापालिका आयुक्तांना डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोहोळ यांनी सुचवलेले मार्ग (Pune Metro)

  • खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका: खराडी आणि परिसर व्यावसायिकदृष्ट्या विकसित होत आहे. येथे Interchangeable and Multimodal Transport Hub झाल्यास पुणे विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गांवरून जाण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
  • खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मार्ग: हा मार्ग पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग झाल्यास प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध होतील.

खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub:

खराडी येथे हब झाल्यास प्रवाशांना वेगवेगळ्या मार्गांवरून विमानतळावर जाण्याची सोय (Pune Metro) होईल. चांदणी चौक ते वाघोली, निगडी ते स्वारगेट आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गांवरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पोहोचणे सोपे होईल. तसेच, खडकवासला-स्वारगेट-हडपसर मार्गावरील प्रवाशांनाही थेट विमानतळावर जाता येईल.यामुळे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने खराडी हब महत्वाचे ठरणार आहे.