Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! आजपासून ‘हे’ नवे मेट्रो स्टेशन खुले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. या स्थानकामुळे वनाज ते रामवाडी असा मेट्रो प्रवास पूर्ण होणार आहे. तर आम्ही(Pune Metro) बोलत आहोत पुण्यातील येरवडा मेट्रो स्थानकाबद्दल…

वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून आजपासून म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पुणेकरांना या सेवेचा आज पासून लाभ घेता येणार आहे. याबाबतची माहिती (Pune Metro) महामेट्रो कडून देण्यात आलेली आहे.

वनाज ते रामवाडी लाईन पूर्णपणे कार्यान्वित (Pune Metro)

पुण्यातील इतर मेट्रोस्थानाकांप्रमाणेच येरवड्यातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. सध्याची पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या पाहता मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. येरवडा मेट्रोस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्यामुळे (Pune Metro) वनाज ते रामवाडी पर्यंतची मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.

कोणाला होणार फायदा ? (Pune Metro)

दरम्यान येरवडा स्थानकामुळे येरवडा येथील रहिवासी आणि उर्वरित भाग मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून पुणे शहराशीही जोडले जातील. त्यामुळे विद्यार्थी, व्यवसायीक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळणार असणाऱ्या आयटी हब मधील (Pune Metro) कर्मचारी आणि रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

या वेळेत सेवा (Pune Metro)

महा मेट्रो कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून येरवडा मेट्रोस्थानक प्रवासी सेवेसाठी सुरू होणार असून सकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान ही सेवा नियमित सुरू राहणार आहे.