Pune Metro Nigdi To Chakan : पुणेकरांसाठी नवीन मेट्रो लाईन!! कुठून- कुठपर्यंत धावणार पहा

Pune Metro Nigdi To Chakan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro Nigdi To Chakan । पुणे हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महत्वाचे औद्योगिक शहर म्हणून पुढे येत आहे. देशातील महत्वाच्या १० शहरात पुण्याची गणना केली जाते. लोकसंख्याचा जर विचार केला तर आजघडीला पुण्याची लोकसंख्या हि दीड कोटीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यात वाहतुकीची समस्या तर नित्याचीच असते. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी नवनवीन रस्ते, मेट्रो लाईन जोडण्याचे काम सुरु आहे. पुणेकरांचा प्रवास सोप्पा आणि आरामदायी व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणजे आता निगडी ते चाकण अशी नवीन मेट्रो सेवा पुण्यात सुरु होणार आहे. हा मार्ग जवळपास ३५ ते ४० किलोमीटरचा असेल. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. चाकणला कामानिमित्त जाणाऱ्यांना या मेट्रोहच मोठा फायदा होईल.

शंकर जगताप यांनी ट्विट करत म्हंटल, निगडी-चाकण मेट्रो: भविष्य योग्य दिशेने वाटचाल करत आहे! पिंपरी-चिंचवडसाठी एक गेम-चेंजर जवळ येत आहे महामेट्रोने अधिकृतपणे पीसीएमसीला तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला आहे – निगडी ते चाकण मेट्रो (Pune Metro Nigdi To Chakan) प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल आहे. स्वर्गीय लक्ष्मणभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, पिंपरी-चिंचवड एक औद्योगिक पॉवरहाऊस बनले. तो वारसा पुढे नेत, मी राज्य विधानसभेत ही मागणी मांडली – आणि आता आपण ते घडताना पाहत आहोत. आपल्या शहरासाठी अधिक स्मार्ट, हिरवे आणि वेगवान भविष्याचे स्वागत करूया असं शंकर जगताप यांनी म्हंटल.

कसा असेल मेट्रो मार्ग – Pune Metro Nigdi To Chakan

प्रस्तावित मेट्रो प्रकल्प हा निगडी ते चाकण या औद्योगिक पट्ट्यातून जाणार आहे. त्यांची लांबी हि जवळपास ३५ ते ४० किलोमीटर आहे. पुणे पिंपरी चिचवड आणि पुण्याचा ग्रामीण भागातूनही मेट्रो जात असल्याने आता पुण्याची गती वाढणार आहे. चाकण एमआयडीसीहून पुण्यात किवा पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. याला एक चांगला पर्याय म्हणून या मेट्रोमार्गाकडे पहिले जाईल.

मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे पिंपरी-चिंचवडमधील आधीच गर्दी असलेल्या रस्त्यांवरील भार कमी होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, निगडी ते चाकण दरम्यानची मेट्रो कनेक्टिव्हिटी औद्योगिक कॉरिडॉरमध्ये सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करून स्थानिक उद्योगांना आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वाढत्या शहरीकरणाचे कारण देत लोणी काळभोर ते उरुळी कांचनपर्यंत मेट्रो नेटवर्क वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रोमुळे पुण्याची गती निश्चित वाढणार आहे.