‘तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!’ पुणेकरांची संतापजनक पोस्ट, मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रविवारी पुणे शहरात स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता पार्किंगच्या कारणावरून मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली.पण कंत्राटदाराने जादाचे पैसे आकारल्याची बाब एका सजग पुणेकराने उघडकीस आणली त्यानंतर प्रशासनाला कडक निर्णय घ्यावा लागला. चला पाहूया हा प्रकार नक्की काय आहे ?

काय आहे नेमके प्रकरण ?

खरंतर शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात पे आणि पार्कसाठी दोन तासांसाठी पंधरा रुपये शुल्क आकारणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराकडून असे झाले नाही. एका तासासाठी पंधरा रुपये हे दुचाकी साठी आणि चार सारखी साठी 35 रुपये आकारात असल्याचं आढळून आलं. नंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क अधिक असल्याचे ट्विटर मधील पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क जास्त असल्याचा दावा केला. याबरोबरच काही प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया कळवत ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मेट्रोचे पार्किंग फ्री करण्यात यावं अशी देखील प्रतिक्रिया एका प्रवाशांना दिली आहे.

कंत्राटदाराचे निलंबन

त्यानंतर मात्र प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागली. याबाबतची माहिती देताना पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी माध्यमांना सांगितलं की, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात पे अँड पार्कची सुविधा सुरू होती. कंत्राटदाराने सोमवारपासून काम सुरू केलं आणि तो ठरल्यानुसार दर आकारत नसल्याचे आम्हाला समजले त्यामुळे आम्ही त्याला काम करण्यापासून रोखलं आणि निलंबितही केलं अशी माहिती त्यांनी दिली आहे.