ठरलं ! ‘या’ दिवशी मोदींच्याच हस्ते होणार पुणे मेट्रोचे उदघाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणेकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एवढेच नाही तर विऱोधकांकडूनही टीका करण्यात आल्या. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

कशी असेल नवी मेट्रो

नव्या मेट्रोसाठी स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ अशी तीन स्थानक असतील. हे पूर्ण अंतर 3.34 किलोमीटर असेल. संपूर्ण भूमिगत ही मेट्रो असून याच्या स्थानकांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. याशिवाय प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक देखील कामे पूर्ण झाली असून स्वारगेट स्थानक ते पीपीपी तत्त्वावरील मल्टी मॉडेल हव्या इमारतीचं काम मात्र अजून बाकी आहे. या नव्या मेटोमुळे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ दहा मिनिटांमध्ये करता येणार आहे. सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रोस्थानक 853 मीटर, कसबा पेठ ते मंडई मेट्रोस्थानक अंतर एक किलोमीटर आणि मंडई ते स्वारगेट मेट्रोस्थानक अंतर 1.48 किलोमीटर इतके आहे सिविल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोस्थानक एकूण अंतर 3.34 किलोमीटर इतके आहे.

स्थानकांमध्ये कोणत्या सुविधांचा लाभ

सरकते जिने आणि लिफ्टची सुविधा, सीसीटीव्ही, माहिती दर्शक एलईडी स्क्रीन, सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर, सेफ्टी डोअर, वातानुकूलित यंत्रणा, फायर यंत्रणा, साधे जिने, ऑनलाईन, ऑफलाइन तिकिटाची सुविधा.