हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजे गणेशोत्सव.. पुढील आठवड्यात मोठ्या उत्साहात राज्यात गणेशोत्सव हा सण सुरू होणार आहे. खास करून मुंबई पुणे सारख्या शहरात तर गणेशोत्सवानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते. गणेशोत्सवानिमित्त राज्यातील अनेक भागातील गणेशभक्त पुणे मुंबईला येतात. फक्त राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून हा सण पाहण्यासाठी गणेशभक्त पुण्यात येतात. यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पहायेला मिळते. या गर्दीचा विचार करून पुणे महामेट्रोने गणेशभक्तांसाठी रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेला आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्या देखील वाढणार आहेत. गणेश चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०२५ सकाळी ६ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर २०२५ रात्री ११ वाजेपर्यंत ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरु राहणार आहे.अशी माहिती पुणे महामेट्रोने दिली आहे.
यावर्षी गणेशोत्सवावेळी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो (Pune Metro) सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो सेवा सुरू झाली आहे. ही मेट्रो स्थानकं थेट मानाच्या गणपतीच्या जवळ आहे. शिवाय, या उत्सवामुळे मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते, त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. गणेश मंडपांची आकर्षक सजावट आणि देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त दरवर्षी पुण्यात गर्दी करत असतात. अशा प्रवाशांना रात्री उशीर झाला तरी घरी पोचता यावे यासाठी पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडई, कसबा या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे.
गणेशोत्सवात मेट्रोचे वेळापत्रक कसं असेल? Pune Metro
गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 06 सप्टेंबरला सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड मेट्रो सुरू राहणार आहे. तर 27 ते 29 ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील, तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, गर्दी टाळून सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.




