हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro : पुणे मेट्रोतील पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज लाखो पुणेकर मेट्रोने प्रवास करत असून यामुळे रस्ते वाहतूक कोंडी बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रोमुळे पुणेकरांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येत असून वेळेची सुद्धा मोठी बचत होतेय . आता याच पुणे मेट्रोबाबत नवीन नियम समोर आला आहे जो प्रत्येक पुणेकराला माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला मेट्रोतून खाली उतरवले जाऊ शकते.
काय आहे नवा नियम ?
महाराष्ट मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने काही वस्तूंची यादी जाहीर केली आहे, ज्या तुम्ही मेट्रो प्रवासादरम्यान घेऊ जाऊ शकत नाही. मेट्रो प्रवास पूर्णतः वातानुकूलित असल्याने डब्यांमध्ये खिडक्या-दारे बंद असतात. त्यामुळे कच्चे मांस, सुखी मासळी, मांसाहार, पदार्थ मेट्रो मधून घेऊन जाता येणार नाही. तसेच कुजलेले, वास येणारे किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे . अशा पदार्थांमुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो तसेच सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. Pune Metro
कोणकोणत्या वस्तुंना मेट्रो प्रवासादरम्यान बंदी – Pune Metro
लायटर, काडेपेटी, तंबाखू, गुटखा, ई-सिगारेट, पेट्रोलिअम पदार्थ, स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, आम्ले, ॲसिड, विषारी आणि किरणोत्सारी पदार्थ, मानवी देहाची राख, कुजलेले प्राणी किंवा पालेभाज्या, कच्चे मांस, सुकी मासळी (सुकट, बोंबिल, खारा मासा, बांगडा). रासायनिक- जैविक संकेतमान्य शस्त्रे, सुकलेले किंवा साकळलेले रक्त, १० सेंटिमीटरपेक्षा लांब कात्री, ४ इंचापेक्षा मोठा चाकू, वैयक्तिक परवाना असलेली बंदूक, ओल्या बॅटऱ्या, स्पिरिट, किरणोत्सारी रेडिओ लहरीचे साधने, विषारी पदार्थ, थिनर, वायू संकुचित पदार्थ, अश्रूधूर, तेलकट चिंध्या, मृत शरीर, मृत किंवा जिवंत पाळीव प्राणी-पक्षी, हाडे.
मांसाहारी पदार्थ फक्त सीलबंद असतील तरच तुम्हाला ते मेट्रो प्रवासादरम्यान नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिजवलेले पदार्थ बंद डब्यात नेता येतील; मात्र प्रवासादरम्यान ते खाता येणार नाहीत. खरं ते हे नियम मेट्रो कडून यापूर्वीही सांगण्यात आले होते. मात्र अनेकांना आजही या नियमांबाबत माहिती नसल्याने प्रवासादरम्यान गोंधळ उडाल्याच्या घटना खूप वेळा समोर आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने या पदार्थाची यादी जाहीर केली आहे.




