पुण्यात राष्ट्रवादीच्या अरूण लाडांनी केलं भाजपच्या संग्राम देशमुखांना ‘ओव्हरटेक’; मतमोजणीत भक्कम आघाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून सगळ्यांचे लक्ष असलेल्या पुण्यात सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे. काहीवेळापूर्वीच याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड हे भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यापेक्षा 10 हजार मतांनी पुढे आहेत.

तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकासआघाडीने भाजपला मागे टाकले आहे. याठिकाणी काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनीही भक्कम आघाडी घेतली आहेत. भाजपच्या दत्तात्रय सावंत यांच्यापेक्षा ते चार हजार मतांनी पुढे आहेत. याठिकाणी आतापर्यंत साधारण 36 हजार मतांची छाननी झाली आहे. जाणकरांच्या मते हाच ट्रेंड आता कायम राहू शकतो. तसे झाल्यास महाविकासआघाडीला भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठे यश मिळू शकते. (Pune MLC election Maharashtra 2020 results)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’