भाजपा नगरसेवकाकडून पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ; पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा प्रयन्त?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. सगळे अधिकारी चोर असा आरोप नगरसेवकाने करत आयुक्तांवर पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा प्रयन्त झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळं बैठकीत तणाव निर्माण होऊन महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीचा सभात्याग केला. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड हे बैठकीसाठी दाखल झाले आहे. संपूर्ण वाद टेंडर वरून झाल्याचं प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे.

दरम्यान,  महापालिकेत टेंडर साठी पिस्तुल आणण्याचा प्रकार नवीन नाही. नगरसेवकांकडून शिवीगाळ झाल्यांनतर अतिरिक्त आयुक्तांसोबत इतर सर्व अधिकारी घटनेचा निषेध करीत बैठकीतून बाहेर पडले. या संपूर्ण घटनाक्रमांनंतर स्थायी समितीची बैठक बंद पडली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment