Pune Nagpur Special Train : पुणे- नागपूरसाठी विशेष ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

Pune Nagpur Special Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Special Train । सध्याचे दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. नुकतंच सर्वानी गणपती विसर्जन केलं आहे. यानंतर आता महिन्याच्या अखेरीस नवरात्री आणि पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण येईल. सणासुदीच्या काळात मुंबई- पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांत काम करणारा नोकरदार वर्ग मूळगावी जातो. एकाच वेळी जास्त लोक प्रवासासाठी बाहेर पडल्याने गर्दी तर होणारच… तसेच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.येत्या २७ सप्टेंबर पासून नागपूर ते पुणे अशी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेगाडी मुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. तसेच नवरात्रीच्या काळात प्रवाशांचा प्रवासही सोप्पा आणि आरामदायी होईल.

कसे असेल ट्रेनचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

मध्य रेल्वेने या विशेष रेल्वेगाडीला (Pune Nagpur Special Train) या मार्गावरील 14 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार, पुणे नागपूर स्पेशल ट्रेन उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड , जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. सद्यस्थितीत नागपूर वरून पुण्याला रेल्वेने यायचं म्हंटल तर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे. अशावेळी या नवीन स्पेशल ट्रेन मुळे प्रवाशांना दिवाळीच्या काळातही जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवायला मिळेल अशी आशा रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.