Pune Nagpur Special Train : पुणे- नागपूर स्पेशल ट्रेन!! कधी आणि कुठून धावणार?

Pune Nagpur Special Train (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Special Train । पुण्यावरून विदर्भांत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरं तर सध्याच्या हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण सुट्ट्यांचा प्लॅन आखतात. त्यातच २५ डिसेंबरला ख्रिसमस नाताल आणि नंतर नवीन वर्षाचं स्वागत असल्याने रेल्वेवर अतिरिक्त ताण हा येणारच, हा विचार डोक्यात ठेऊन रेल्वे विभागाने मुंबई आणि पुण्याहून नागपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या जाहीर केल्या आहेत. या ट्रेन मुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल असा विश्वास रेल्वे विभागाला आहे. अशावेळी पुणे- नागपुर ट्रेनचे वेळापत्रक आज आपण जाणून घेऊया. तसेच हि ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबेल ते सुद्धा पाहुयात.

कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल.या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील.ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Pune Nagpur Special Train

कशी असेल ट्रेनची रचना –

या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार –

पुणे ते नागपूर स्पेशल ट्रेनला महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. सणासुदीच्या कालावधीत नागपूर–पुणे मार्गावरील तिकिटे सहसा लवकर संपतात. अशा वेळी विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने अतिरिक्त मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल. प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.