Pune Nashik Expressway : पुणे- नाशिक प्रवास अवघ्या 3 तासांवर; सरकारचा 28000 कोटींचा प्रकल्प

Pune Nashik Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik Expressway । पुणे आणि नाशिककरांसाठी महत्वाची बातमी आहे. एकीकडे पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग कधी सुरू होईल हे अजून स्पष्ट नसलं तरी पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या नव्या द्रुतगती महामार्गाला मात्र आता गती मिळाली आहे. सरकारने तब्बल २८ हजार ४२९ कोटींचा खर्च करत, या दोन्ही शहरांना जोडणारा १३३ किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग उभारण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी द्रुतगती महामार्गांची निर्मिती केली जात आहे. या महामार्गामुळे पुण्याहून नाशिकला किंवा नाशिकहुन पुण्याला प्रवास करणे अतिशय सोप्प आणि कमी वेळेत होणार आहे.

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती (Pune Nashik Expressway) महामार्गाच्या अंतिम आखणीला सरकारने फेब्रुवारी 2024 मध्येच मान्यता दिली होती. हा महामार्ग सुरत – चेन्नई महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचा इतर राज्यांतील वाहनचालकांना फायदा होणार आहे. महामार्गाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) आणि व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्य सरकारकडे सादर केला जाईल. या महामार्गाची लांबी १३३ किलोमीटर असून ३ वर्षांत तो पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी १५४५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

कोणकोणत्या तालुक्यातून जाणार? Pune Nashik Expressway

पुणे आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाईल… पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतून आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा नवा महामार्ग तयार केला जाईल. अहिल्यानगर आणि नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून, औद्योगिक इंडस्ट्रीला आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळेल.

कसा असेल नवा महामार्ग ?

पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गावर (Pune Nashik Expressway) १२ मोठे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. नद्या, नाल्यांवर हे पूल उभारले जातील. पुणे जिल्ह्यातील चिंबळी, चाकण, पाबळ तसेच अहिल्यानगर, नाशिकमधील राजुरी, खंडारमाळ, साकूर, माची, कासारे या ९ ठिकाणी इंटरचेंज असेल. महामार्गावर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना या इंटरचेंजचा वापर करण्यात येईल. तसेच महामार्गाला शिर्डीचा मार्गही जोडला जाणार आहे, असं म्हंटल जात आहे.