हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik Semi High Speed Train । प्रस्तावित पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे . मध्य रेल्वेने या कॉरिडॉरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम केला आहे. आता हा DPR रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला नक्कीच गती मिळणार आहे. पुणे आणि नाशिक हि दोन्ही शहरे औद्योगिक शहरे आहेत. दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही शहरांना जोडणारी थेट रेल्वे लाईन तयार व्हावी अशी मागणी होत आली आहे. अखेर या कामाला यश मिळताना दिसत आहे.
किती अंतर आहे – Pune Nashik Semi High Speed Train
नवीन डीपीआर नुसार, पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्ग हा (Pune Nashik Semi High Speed Train) सध्याच्या महामार्गाला समांतर असणार आहे तर शिर्डी पासून नाशिक पर्यंत नवीन महामार्ग निश्चित केला जाणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर अंतराचा असू शकतो. यातील पुणे ते अहिल्यानगर अंतर १२५ किलोमीटर तर अहिल्यानगर ते शिर्डी दरम्यानचे अंतर ८२ किलोमीटर आहे. हा नवीन २३५ किलोमीटरचा मार्ग पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे ४५ मिनिटांनी वाढवू शकतो, परंतु या रेल्वेमार्गात कोणताही अडथळा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या प्रस्तावित ‘सेमी हायप्सीड’ प्रकल्पाचा (Pune Nashik Semi High Speed Train) सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे. कागदोपत्री त्रुटी दूर करण्यात येत असून, दुरुस्तीअंती वरिष्ठांकडे हस्तांतरित करण्यात येईल. साधारणतः आठवडाभरात हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती मोहित सिंग, उपमुख्य अभियंता, मध्ये रेल्वे, पुणे विभाग यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे ते नाशिक सेमी -हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची अंदाजे किंमत १६,००० कोटी रुपये आहे आणि या मार्गावरून प्रतितास २०० किलोमीटर क्षमेतेने रेल्वे धावू शकतात. हा रेल्वे प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुणे ते नाशिक रेल्वे कॉरिडॉरमध्ये २४ स्थानके असतील, ज्यामध्ये १३ प्रमुख आणि ११ लहान स्थानकांचा समावेश आहे.




